
| नवी दिल्ली | जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. या नव्या स्ट्रेनची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. हा नवीन स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.
त्यामुळे तिथे लॉकडाउन अधिक कडक करण्यात आला आहे. या नव्या स्ट्रेनच्या धोक्यामुळे जगातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नेदरलँड आणि बेल्जिअमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतातही काही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याची मागणी केली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे जगाच्याबरोबरीने भारताची देखील चिंता वाढवली आहे. कारण आधीच करोना व्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी, ‘सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नाही’ असे म्हटले आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री