
| ठाणे | ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.
”काल मी माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…” असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, गेली ५ महिने लॉक डाऊन झाल्यापासून पायाला भिंगरी लावून जनसामान्यांसाठी अहोरात्र त्यांनी मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि लोकाभिमुख कारभार करणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत अशी आहे. दरम्यान या काळात देखील त्यांचा अतिशय दांडगा जनसंपर्क होता. थेट कोविड सेंटर मध्ये जावून आपल्या सहकाऱ्यांची त्यांनी विचारपूस देखील केली होती.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!