
| कल्याण / प्रकाश संकपाळ | सामाजिक बांधिलकी जपून महिलांच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत व प्रसिद्धीच्या मोहापासून अलिप्त अशा ९ कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांच्या पुढाकाराने कल्याण परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व कोरोना महामारीच्या काळात गरजू व गरीबांना अहोरात्र मदत करणाऱ्या कोरोना योद्धा असलेल्या ९ महिलांचा सत्कार व सन्मानपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, जिल्हाध्यक्षा नयना भोईर, जिल्हा सचिव वासंती जाधव, जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड, जिल्हा संघटक भारती कुमरे, नगरसेविका तृप्ती भोईर, उपशहर अध्यक्षा गीता काट्रप, शहर संघटक वैशाली सोनटक्के, विभाग अध्यक्षा भारती डाकवे, सुधा शहा,उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे, उपशाखा अध्यक्ष सागर कोळजे, मनवीसे अध्यक्ष विशाल वाघचौरे, समाजसेवक सतिश साळवी, पत्रकार चारुशीला पाटील, शाही मुल्ला, किरण गायकवाड, स्वप्नील कदम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
रुपाली आळंदे, (पोलीस), अनुसया कांबळे (समाजसेविका), डॉ.वृषाली थोरात-घारगे ( वैद्यकीय सेवा), स्वरा देसाई ( पोलीस ), विद्या आरेकर ( वैद्यकीय ), गीता बोरगावकर ( लघु उद्योजिका), कविता लोखंडे ( पत्रकार ), डॉ. तेजस्विनी माळवी ( वैद्यकीय) आदींना साडी, चोळी, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांनी महिलांचा सन्मान करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परंपरा असल्याचे स्पष्ट करून कोरोना महामारीच्या काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता समाजातील गरजूंना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली असून भविष्यात त्यांनी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होवो तसेच स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरूच आहे. महिलांच्या सक्षमीकरण, सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी, त्यांच्या कार्य कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी आपण नेहमीच त्यांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. स्त्री या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि ही शक्ती सक्षम बनविणे, तिला सन्मान देणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रांजळ मत जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती कदम व्यक्त केले आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!