कल्याण टिटवाळा रिंगरुट साठी बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा, रस्त्याच्या कामास वेग मिळण्याची शक्यता..!

| कल्याण | कल्याण टिटवाळ्यातील रिंगरुट कामात अडथळा ठरत असलेला एका बंगला, १ घर तसेच एक धोकादायक इमारत, २ अनधिकृत रुम पाडण्याची धडक कारवाई कल्याण डोंबिवली महापालिका ‘अ’ प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने केली.

त्यामुळे परिसरातील रिंग रुटच्या कामाला गती मिळणार आहे. तसेच अनधिकृत खोल्यांवरील कारवाईमुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

टिटवाळा परिसरातील रिंग रूटचे काम सुरू असुन या रिंगरूटमध्ये काही घरे बाधीत होत आहेत. अशा बाधित घरावर ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी पालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनुसार निष्कासनची धडक कारवाई करीत रिंग रूट मधील बाधित बांधकामे अनाधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याचे सुरु ठेवले आहे .

गुरुवारी प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी ‘अ’ प्रभागक्षेत्रातील टिटवाळ्यातील रिंगरूटमध्ये बाधित होणारे पिटर परेरा यांचा बंगला तसेच महागणपती मंदिरामागे १ घर अशी दोन घरे पाडून रिं रूट मधील अडथळा दूर केला. तसेच टिटवाळ्यातील जयंवत जोशी यांची धोकादायक इमारत निष्कसित करण्यात करून भुईसपाट करण्यात आली. दोन अनधिकृत रूमवर हतोडा चालवित जमीनदोस्त करण्यात आल्या. टिटवाळ्यातील एका अनधिकृत बांधकाम प्रकरणी एका विकासकावर गुन्हा दाखल केला आहे. तर कोरोना पार्श्वभूमीवर मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत तब्बल सुमारे १ लाख ५०हजार रुपये दंड वसूल केला आहे. रिंगरुटबाधित घरांना पाडण्याची कारवाई प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल, ८ पोलीस कर्मचारी, ‘अ’ प्रभागक्षेत्र अनधिकृत बांधकाम कर्मचारी, १जे सी बीसह करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *