| डोंबिवली | दि. ३ नोव्हेंबर २०२० रोजी कल्याण डोंबिवली मधील विविध विकासकामांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. डोंबिवली क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता म्हणजे कल्याण शीळ रस्त्यावरील सुयोग हॉटेल समोरील रस्ता जी. एन. पी. मॉल ते पेंढारकर कॉलेजपर्यंत सुमारे ३ कोटी ८६ लाख निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे कामाचे भूमिपूजन सोहळा करण्यात आला. सदर रस्ता हा सांस्कृतिक डोंबिवली शहरात प्रवेश करण्याकारीतेचा मुख्य रस्ता आहे. परंतु गेली कित्येक वर्ष सदर रस्ता डांबरीकरण असल्यामुळे पावसाळ्यामध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय असायची, हे लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा करून सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे रुपये ३.८६ कोटी मंजूर करून आणले. तसेच यावेळी संबधित कंत्राटदाराला काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेश देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.
कल्याण डोंबिवली मनपा मार्फत कल्याण स्मार्ट सिटी या प्रकल्पामध्ये महापालिका क्षेत्रात प्रत्येक चौकात सी.सी. टीव्ही लावण्याचे काम सुरु आहे, त्याचबरोबर क.डों.मनपा क्षेत्रातील प्रभाग क्र. ९८ मध्ये देखील खासदार विकासनिधी अंतर्गत व नगरसेविका शीतल मंढारी यांच्या प्रयत्नाने सी.सी. टीव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून आज त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. , डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, विधानसभा क्षेत्रप्रमुख एकनाथ पाटील, उपतालुका प्रमुख बंडू पाटील, विधानसभा संघटक कविता गावंड, तात्यासाहेब माने, महानगरप्रमुख वैशाली दरेकर, शहर संघटक मंगला सुळे, नगरसेविका पूजा म्हात्रे, नगरसेवक विश्वनाथ राणे, नवीन गवळी, दिपेश म्हात्रे, रमेश म्हत्रे, महेश गायकवाड, देवानंद गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .