| कल्याण | कल्याण पूर्वेतील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. लवकरच हे पाडकाम रेल्वेकडून केले जाणार आहे. या पादचारी पूलासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. रेल्वेचे अप्पर मंडल प्रबंधक आशुतोष गुप्ता यांनी ही माहिती पत्रद्वारे खासदार डॉ. शिंदे यांना कळविली आहे.
लोकग्रामचा पादचारी पूल हा कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा पूल धोकादायक झाल्याने तो पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पूलाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत अनेक वेळेस बैठका सुद्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांतर रेल्वेने जुन्या पुलाच्या पाडकाम करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कल्याण पूर्व लोकग्राम पादचारी पुलाचे पाडकाम लवकर सुरु होणार आहे.
पूलाच्या कामासाठी लागणाऱ्या प्राकलन रक्कम, नकाशा आरेखन आदी कामाकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेने १ कोटी ३२ लाख रुपये खर्च देणे अपेक्षित आहे. पूलाच्या बांधकामाकरीता ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. उर्वरीत ३० कोटी रुपये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून मंजूर केले जाणार आहेत. रेल्वेने आजच्या घडीला केवळ पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर पाडकाम संपण्याच्या आत पादचारी पूलाच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांना सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे पाडकाम संपताच नव्या बांधकामाला लगेच सुरवात करण्यात कोणताही अडथला व विलंब होणार नाही.
सिद्धार्थनगर स्कायवॉक तिकीट खिडकीनजीकच एक प्रसाधनगृह बांधण्याची मागणी वारंवार प्रवासीवर्गांकडून केली जात होती. याची दखल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेऊन रेल्वे प्रशासनास तातडीचे निर्देश देण्यात आले होते, त्याअनुषंगाने प्रसाधनगृहाच्या कामाला रेल्वेने मंजूरी देऊन काम सुरु देखील करण्यात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून खा. डॉ. शिंदे यांना कळविण्यात आले आहे.https://twitter.com/thelokshakti/status/1305501789551165443?s=19
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .