कल्याण शीळ रस्त्याची कोंडी फुटतेय; खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे पत्री पूल लवकरच राहतोय उभा..!

| कल्याण | कल्याण येथे पत्रीपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकस महामंडळमार्फत हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या ७६.०० मीटर लांबीचा गर्डर फॅब्रीकेशनचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या लॉचींग प्रक्रियेकरिता रेल्वे विभागाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती संपूर्ण पूर्व तयारी म.रा.र.वि. महामंडळाने केली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या अनुषंगाने दि. ११ नोव्हेंबर रोजी महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांचेसमवेत बैठक आयोजित केली होत. विभागीय मध्य रेल्वेचे रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, एम.एस.आर.डी.सी. अधिकारी सोनटक्के, व राईट्स संस्था याच्या उपस्थितीत निर्णय झाल्यानुसार पत्रीपुलाच्या गर्डरच्या लॉचींग करण्याकरिता दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी दिवसा प्रत्येकी ४ तास असा ८ तासांचा ब्लॉक मंजूर करण्याबाबतची विनंती केली होती, तसेच दुसरा ब्लॉक दि. २७ व २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी ३ तास असा ६ तासांचा ब्लॉकला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार या गर्डरचे लॉचींगचे काम दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी दिवसा व २७ व २८ नोव्हेंबर रोजी रात्री करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

परंतु ब्लॉक दरम्यान बऱ्याच लोकल रेल्वे रद्द कराव्या लागणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या सोडविण्याकरिता उपाय योजना करावयाचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच लॉचींगचे काम सुरक्षितपाने करण्यासाठी व त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये करिता रेल्वे रिझर्व फोर्स तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाकडून पुरेशी सुरक्षायोजना करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची वाहतुकीची गैरसोय होऊ नये याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका व ठाणे महानगरपालिका या प्रशासनामार्फत अतिरिक्त बस सेवा सुरु करण्याबाबत आवश्यकता राहील याकरिता स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करून सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच लॉचींग गर्डर सुलभ व सुरक्षित व्हावे याकरिता आवश्यक त्या सर्व अतिरिक्त सोईसुविधा सुद्धा कंत्राटदारांमार्फत करण्याचे सूचना खा.डॉ.शिंदे यांनी दिले.

याशिवाय कल्याण शिळ रस्त्यावरील कटाई रेल्वे उड्डाणपुलाचे नकाशे बऱ्याच कालावधीपासून मंजुरीसाठी प्रलंबित होते. आजच्या बैठकीमध्ये या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार याच आठवड्यात याचे नकाशे मंजूर करण्यात येतील अशी माहिती रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली. या दोन्ही पुलाचे काम मार्गी लागल्याने कल्याण डोंबिवली या क्षेत्रातील नागरिकांची बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असणारी मागणी पूर्णत्वाकडे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.