किल्ले विशाळगडाचे पुनर्वैभव प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी लक्ष घालावे; मराठीमाती प्रतिष्ठानची मागणी!

| मुंबई | छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशाळगडचे दुरावस्था दूर करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी एक्का फाऊंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी केली आहे.

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराजामधील महत्त्वाचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी ब दिव्य इतिहासाचा साक्षीदार असलेला विशाळगड हा किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सह्याद्री च्या रांगात दिमाखात उभा असलेला विशाळगड किल्ला आज अस्वच्छता, पडझडीने ग्रस्त होत आहे. किल्ल्यावरील वाढलेली वस्ती, गलिच्छ रस्ते , गडावरील राजवाडा व समाधी यांची अतिशय विदारक अवस्था आहे. चिकन मटण खाण्यासोबतच दारु व नशेच्या पाटर्या होत आहेत. किल्ला परिसरात प्लास्टिक, कचराचे साम्राज्य झाले आहे. गडावरील मंदिराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. किल्ला परिसरात येणारे लव्ह बर्ड आपल्या बेगडी प्रेमाची प्रतिके म्हणून किल्ल्यावर नावे रेखाटून किल्ल्याच्या भिंती अस्वच्छ व बिभत्स करत आहेत.

किल्ल्याचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी शिवप्रेमी, गिरीप्रेमी, पर्यटक यांचा आवाज शासन दरबारी पोहचावा म्हणून एक्का फाऊंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न केला जात आहे.

पर्यावरणप्रेमी व संवेदनशील असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एक्का फाऊंडेशन संचालित मराठीमाती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांना निवेदन देवून किल्ला बचावाचा आर्जव केला आहे.

प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील या विषयामध्ये लक्ष घातले आहे.

मराठी माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील, सचिव प्रविण काळे देशमुख, खजिनदार सचिन घोडे, अतुल आवटे, अरुण घोडे, विकास चव्हाण, किरण लहामटे, गिरीष शेलार, योगेश घरत, मारूती बोराडे, संतोष भोये, प्रतिक मडावी, अशोक मिसाळ, सुनिल मंचरे, निलेश मोरे, सोमनाथ कुदळे, विद्या भोते, राजश्री गायकवाड, अमोल आग्रे आदी या विषयी पाठपुरावा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *