| पुणे / महादेव बंडगर | भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षामध्ये देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येणाऱ्या भविष्याचा वेध घेऊन अत्यंत महत्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे कृषी विधेयक. या विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपा किसान मोर्चाच्या वतीने दौंड तालुक्यातील वरवंड ते केडगाव चौफुला अशी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली आहे. त्यामध्ये हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांनी केले आहे.
मोदींनी या देशातील गोरगरिब , आदिवासी , मागासवर्गीय , महिला , सैनिक , शेतकरी , युवक , व्यापारी , व्यावसायिक अशा सर्व घटकांना केंद्रस्थानी धरून विकासाची गंगा थेट समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्याचा भगीरथ प्रयत्न केला आहे. मोदींनी भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर अत्युच्च करण्याचे काम केलेले आहे.शेतकऱ्यासाठी वार्षिक ६ हजार रूपये पी.एम.किसान व्दारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा . किसान क्रेडिट व्दारे १ लाख ६० हजाराचे विना तारण कर्ज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध.पिकविमा पध्दतीत अमुलाग्र बदल , बटाटा , कांदा , जीवनाश्यक वस्तुमधुन वगळले , निमकोटेड युरियाच्या माध्यमातुन काळा बाजार संपवणे , १२ रूपये मध्ये २ लाख विमा जनधन खाती , ग्रामिण भागातील महिलांना उज्वला गॅस मोफत जोडणी , उसाची आधारभूत खरेदी किंमत ( FRP ) मंजुर करणे , नदी जोड प्रकल्प , साठवण गोदाम , शीतगृह उभारणीसाठी मोठे अनुदान . प्रक्रिया उद्योगास अनुदानपर प्रोत्साहन , केंद्रीय पशु संवर्धन योजना लागु करणे, कांदा साठवण चाळीसाठी विशेष अनुदान, वनौषधी लागवड , बांबू लागवड व त्यात मोठया प्रमाणात होत असलेले अडथळे दुर करून बांबूचा वृक्षाचा दर्जा काढुन गवत गटामध्ये गणती त्यामुळे बांधकाम व्यवसायातील वापरात वृध्दी , देशामध्ये १० हजार शेतकरी उत्पादक गटांच्या स्थापनेस मंजुरी देऊन सभासदांनी उभे केलेल्या भांडवला एवढीच गुंतवणुक केंद्र सरकार करणार व त्या गटांना २ कोटी पर्यंत विना तारण कर्ज देण्याची तरतुद . हे वरील व या सह अनेक शेतकरी हितांचे निर्णय मा.मोदिंनी घेण्याचा सपाटा चालु केलेला आहे. या सर्व गोष्टींसोबतच नुकतीच कृषी विधेयकाला लोकसभेत मंजुरी दिली.सदरची विधेयके मंजूर करून शेतकऱ्यांना देशाअंतर्गत स्पर्धात्मक बाजारपेठेशी जोडण्याचा निर्णय झाला.शेतकरी स्वांतत्र्यानंतर ७० वर्षानी सर्व प्रकारच्या जोखडातुन मुक्त करण्याचे काम मोदींनी केले . परंतु विरोधी पक्षांना हे सहन होत नसल्याने त्यांनी पुन्हा दलालांची दलाली करण्याचे धोरण अवलंबिले आहे. व या विधयेकांना विरोध सुरू केला. या विरोधकांनी एवढी खालची पातळी गाठली की मागील आठवडयामध्ये दिल्ली गेट येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क ट्रॅक्टर जाळण्याचे काम केले . म्हणून आपण आपल्या संस्कृतीमध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या बैलांची पुजा करतो , शेती अवजारांची पुजा करतो. सध्या बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.त्यामुळे बळीराजाची देवता असलेले बैल आणि ट्रॅक्टरचे पुजन गावोगावी करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतल्याने महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने बळीराजा सन्मान , ट्रॅक्टर पुजन व भव्य रॅलीचे आयोजन सोमवार 12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 12:15 वाजता वरवंड ते केडगाव चौफुला दरम्यान रॅलीचे आयोजन केलेले आहे. व समारोप चौफुला येथे होणार आहे .
या समारोप कार्यक्रमाला मा.चंद्रकांतदादा पाटील ( भाजपा प्रदेश अध्यक्ष ) , डॉ.अनिल बोंडे ( भाजपा प्रदेश अध्यक्ष , किसान मोर्चा ) , आ.सुजितसिंह ठाकुर , आ.राहुल कुल , गणेश भेगडे , मा.मंत्री हर्षवर्धन पाटील , मकरंद कोरडे , सुधीर दिवे , आनंदराव राऊत , धर्मेंद्र खांडरे हे उपस्थितीत राहणार आहेत.तरी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कृषी विधयेकाचे समर्थनार्थ निघणाऱ्या रॅलीमध्ये आपल्या ट्रॅक्टरसह उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांनी केले आहे .
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .