केतकी चितळे ची जीभ घसरली..

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे यांची सोशल मीडियावरील पोस्ट म्हणजे एकप्रकारे अपप्रचार असून, त्यांच्याकडून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, असे ऑल इंडिया पॅंथर सेना विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षा उत्कर्षा शेळके यांनी म्हटले आहे.

आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाणदिन अशा सर्व प्रसंगी रेल्वेचे उत्पन्न वाढल्याची आकडेवारी त्यांनी माहितीच्या अधिकारात मिळवावी, असे आव्हान शेळके यांनी चितळे यांना दिले आहे. फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशी विधाने करण्यापेक्षा चितळे यांनी अभिनयावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही शेळके यांनी त्यांना दिला आहे.

काय म्हणाली केतकी?

नवबौद्ध ६ डिसेंबरला मुंबईत फुकट दर्शनासाठी येतात. तो त्यांच्या धर्म विकासासाठीचा हक्क असतो. मात्र, आम्ही फक्त ‘हिंदू’ असं शब्द उद्गारला तर आम्ही घोर पापी आणि कट्टरवादी? पण अर्थात चूक कोणाचीच नाही तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत की आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडूही देतो आणि स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.

1 Comment

  1. Pingback: Drug Rehab

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *