खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय नाईकडे यांचा ‘शिक्षण क्रांतीचे प्रेरणास्रोत’ म्हणून सन्मान..

| पुणे / महादेव बंडगर | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुका पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर आला. यासाठी खेड तालुक्याचे भूमिपुत्र गटशिक्षणाधिकारी श्री संजय नाईकडे गेल्या दोन वर्षांपासून कष्ट घेत होते. शिक्षकांना मार्गदर्शन , सातत्याने प्रेरणा , विविध कार्यशाळा, सराव परीक्षा अशा विविध उपक्रमांचे नियोजन करून साहेबांनी खेड तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेबाबाबत उत्साही वातावरण निर्माण करून दिले.

त्यांच्या प्रयत्नांना तालुक्यातील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व खूप मेहनत घेतली आणि त्याची प्रचिती शिष्यवृत्ती निकालातून दिसून आली व खेड तालुका पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर विराजमान झाला. भविष्यात प्रथम क्रमांक प्राप्तीसाठी आतापासून तयारी सुरू झाली. या संपूर्ण यशाचे शिल्पकार म्हणून मा श्री संजय नाईकडे  यांच्याकडे पाहिले जाते. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन खेड यांच्याकडून सर्व शिक्षकांच्या वतीने “शिक्षणक्रांतीचे प्रेरणास्रोत” म्हणून श्री. नाईकडे यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी श्री सचिन गावडे, अध्यक्ष म. रा. जुनी पेन्शन हक्क संघटन, श्री विठ्ठल भटकर उपाध्यक्ष, श्री प्रशांत कुंजीर, श्री जीवन कोकणे विस्तार अधिकारी, श्री भीमराव पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन अभंग, गवळण, भावगीत स्पर्धेचे विजेते. श्री प्रवीण गायकवाड सर व श्रीम सुवर्णा तांदळे-मिसाळ यांचा देखील मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.