
| मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेत्यांना सांगावं लागतंय. दरम्यान भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचेही ते म्हणाले. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलींय. बच्चू कडुंचे हे विधान खरं ठरणार असेल तर हे आमदार कोण असतील ? यावर चर्चा सुरु आहे.
देवेंद्र फडणवीस सक्षम विरोधीपक्ष नेता असल्याचे कबुल करतील तेव्हा भाजपातील ४० आमदार फुटतील असा दावाही बच्चू कडू यांनी केलाय. तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून विरोधी पक्षच अस्तिर असल्याचा टोला राज्यमंत्री बच्चू कडू भाजपाला लगावलाय. पुढील ५ वर्षे महाविकास आघाडीचं सरकार स्थिर राहीलं असेही ते म्हणाले.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..