
| गडचिरोली | जिल्ह्यातील किसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवानांच्या कामगिरीचं कौतुक केलं. कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी 60च्या जवानांना यश आले. यासाठी पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, तसेच सी 60चे कमांडो आणि चमूचे अभिनंदन, अशा भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या आहेत.
उपविभाग धानोराअंतर्गत पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील या जंगल परिसरात पोलीस अधीक्षक गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सी 60चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवताना हल्ला झाला. घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. गडचिरोलीतल्या किसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
रविवारी संध्याकाळी जवळपास चार वाजताच्या सुमारास किसनेलीच्या जंगलात सी -60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. ही चकमक अद्यापही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सी- 60 कमांडोंनी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही कारवाई केली. या अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं.
गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि जवानांमध्ये अशाच प्रकारे चकमक उडाली होती. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात रविवारी (15 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास ही चकमक उडाली होती. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात अलिकडच्या काही वर्षांत नक्षल चळवळ खिळखिळी झाली. गेल्या दोन वर्षांत जवळपास 90 हून अधिक सशस्त्र नक्षलवादी आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
” कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी ६० जवानांना यश आले. यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री.संदीप पाटील, पोलीस अधीक्षक श्री.अंकित गोयल, तसेच सी ६० चे कमांडो चमूचे अभिनंदन…”
– एकनाथ शिंदे
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!