गणपती मूर्ती खाली संविधान ठेवल्याने ट्रोल झालेल्या प्रविण तरडे यांचा माफीनामा आला..!

| मुंबई | शनिवारी सा-या देशात आणि परदेशातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाची सुरुवात झाली. प्रत्येकानं आपल्या परिनं गणरायाची प्रतिष्ठापना करत त्याच्यासाठी खास आरासही तयार केली. कलाकार मंडळीसुद्धा यात मागे राहिले नाहीत. गणपती बाप्पासाठी दरवर्षी काहीतरी सुरेख आणि तितकीच आकर्षक अशी सजावट करण्याकडे अनेकांचा कल असतो. कित्येकजण त्यासाठी विविध नवनवीन संकल्पनाही अंमलात आणतात.

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही अशाच संकल्पनेसह यंदाच्या वर्षी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. पण, बाप्पासाठी कल्पकतेनं केलेली आरास त्यांना अडचणीत आणणारी ठरली. ज्यामुळं अखेर सोशल मीडियावर त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करत एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांची जाहीर माफी मागितली.

यंदाच्या वर्षी तरडे यांनी पुस्तक गणपती या संकल्पनेअंतर्गत बुद्धिदेवता गणरायाचा पुस्तकांची आरास करत त्यात विराजमान केलं होतं. सोशल मीडियावर त्यांनी याचा फोटोही पोस्ट केला. पण, असं करताच त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली. पुस्तकांचा ढीग रचत तरडे यांनी ही आरास साकारली. पण, यामध्ये त्यांनी भारतीय संविधानावर पाट ठेवत त्यावर बाप्पांना विराजमान केलं. ही बाब अनेकांनाच खटकली. तरडे यांची ही कृती खटकल्याची बाब निदर्शनास आणत त्याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली. ज्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्याकडून ज्यांच्या भाववा दुखावल्या गेल्या आहेत अशा सर्वांचीच जाहीर माफी मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *