गत हंगामातील FRP ची सर्व रक्कम शेतकऱ्यांना अदा करा ; अन्यथा साखर आयुक्तालयाला टाळे ठोकणार- वासुदेव काळे.

| पुणे /महादेव बंडगर | महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे असलेली मागील एफ आर पी ची थकबाकी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ व्याजासह अदा करण्यात यावी. अन्यथा साखर आयुक्तालयाला टाळे ठोकू असा इशारा किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी सर्व पिकवलेला ऊस साखर कारखान्यांना देतो. एकदा शेतातील माल साखर कारखान्याच्या गव्हाणीत पडला की कारखानदार मालक होतो. आणि काही कारखाने वगळता बऱ्याच कारखान्यांना एफ आर पी च्या कायद्याचा विसर पडतो त्यामुळे ज्या कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाची किंमत दिली नसेल अशा सर्व साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी एफआरपीची थकीत रक्कम वर्ग करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे .

साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, माऊली शेळके, माऊली चवरे, संजय घुंडरे, केशव कामठे, काकासाहेब खळदकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *