| सोलापूर / महेश देशमुख | माढा विधानसभा मतदारसंघामधील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत,यामध्ये बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी पंधरा लाख रुपयांचा विशेष निधी देणार असल्याचे माढ्याचे आ.बबनराव शिंदे यांनी जाहीर केले.
यावर्षी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये माढा तालुक्यातील सर्वाधीक ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या माढा तालुक्यातील ६१ पंढरपूर तालुक्यातील २७ व माळशिरस तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीचा सामावेश आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होत असताना सामाजिक अंतर पाळणे,नियमांचे कोटेकोरपणे पालन करणे जिकीरीचे होणार आहे, याचबरोबर निवडणुकांसाठी शासनाचा व उमेदवारांचा अनावश्यक खर्च होतो. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध करण्याकडे गावा-गांवातील नेतेमंडळींनी प्रयत्न करावेत असे आवाहन आ.बबनराव शिंदे यांनी केले आहे.
बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी आपण १५ लाख रु. चा विशेष निधी ग्रामपंचायत जी कामे सुचवतील त्यासाठी आमदार निधीतून देऊ असे सांगुन आ.शिंदे म्हणाले कि, पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत हा विकासाचा घटक असून गावच्या विकासासाठी गावातील नेतेमंडळी,मतदार यांनी राजकारण न आणता बिनविरोध पध्दतीने ग्रामपंचायत निवडणुक पार पाडल्यास त्याचा गावाच्या कल्याणासाठी फायदा होईल त्यामुळे निवडणूक लागलेल्या गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होण्यास प्रयत्न करावेत असे आवाहन आ.शिंदे यांनी केले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .