| नवी दिल्ली | पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला.
विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन दूरदृश्यप्रणालीच्या व्दारे करण्यात आले. एआयसीटीई अंतर्गत असणाऱ्या देशातील विविध संस्थांना १४ श्रेणींमध्ये ३४ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांना विशिष्ट क्षेत्रात त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहित करणे, मान्यता देण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यामुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.
यावेळी श्री. पोखरियाल म्हणाले, भारतात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता महामारीपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान सध्या देशासमोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक संस्था संशोधनाव्दारे मदत करीत आहेत. त्यामुळेच विश्वकर्मा पुरस्कार २०२० या वर्षाची संकल्पना ‘इंडिया फाइट्स’ कोरोना अशी ठेवली आहे.
संपूर्ण १४ श्रेणींतील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेला सन्मानित करण्यात आले. यासह या महाविद्यालयाला दुसऱ्या श्रेणीतील दुसरा पुरस्कारही प्राप्त झाला. दुसऱ्या श्रेणीतील तिसरा पुरस्कार पुण्यातीलच डॉ. डी.वाय.पाटील, औषध विज्ञान आणि संशोधन संस्थेला प्रदान करण्यात आला. सहाव्या श्रेणीतील दुसरा पुरस्कार औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी विद्यालयाला प्रदान करण्यात आला. नवव्या आणि अकराव्या श्रेणीतील क्रमश: दुसरा आणि तिसरा पुरस्कार पुण्यातील विश्वकर्मा तांत्रिक संस्थेने पटकावला आहे, असे एकूण ८ पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले आहे.
विविध १४ श्रेणींसाठी ३३ संस्थांची निवड करण्यात आली. यासाठी ९०० हून अधिक संस्थांची नोंदणी झाली होती. या श्रेणीमध्ये आसपासच्या परिसरातील आयोजित जनजागृती कार्यक्रम, समुपदेशन / टेली समर्थन प्रदान, सामुग्री / उत्पादन – उत्पादित / विकसित (उदा. मास्क , सॅनिटायझर, व्हेंटिलेटर इ.), साहित्य / उत्पादन वितरीत (उदा. मास्क , सॅनिटायझर, साबण, अन्न, कपडे, औषध, अभ्यास साहित्य इ.), सार्वजनिक मालमत्ता देखभाल (इमारत / उपकरणे), लॉकडाउन कालावधी दरम्यान तुमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी किती नाविन्यपणे तुम्ही वर्ग घेणे , जवळच्या महाविद्यालयीन / शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टीचिंग लर्निंग कार्यक्रमाचे आयोजन, कोविड -19 चा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या संस्थात्मक पायाभूत सुविधा, प्रदान केलेल्या अन्य मदतीचा तपशील (दौरा, सेवा, स्थलांतरितांना मदत इ.), मदत निधीसाठी तुमची संस्था / प्राध्यापक / विद्यार्थ्यांनी दिलेले आर्थिक योगदान, कोविड -19 च्या प्रसार आणि प्रतिबंधाविरूद्ध प्रकल्प / योजना / उपक्रम राबविण्यात अधिकाऱ्यांना मदत करणे, कोविड –19 च्या विरूद्ध इतर कोणतेही योगदान, कोविड -19 नंतर पुनर्विकास / पुनर्वसन योजना या श्रेणींचा समावेश होता.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .