गिरीश महाजन यांना भाजप कार्यकर्त्याची शिवीगाळ..? ऑडियो क्लिप व्हायरल..!

| जळगाव | एकनाथ खडसे यांच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात प्रभावी असलेले आणि भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले नेते गिरीश महाजन यांना एका कार्यकर्त्यांने शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. महाजन यांना शिवीगाळ करण्याबरोबरच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कारवर दगडफेक केली. या घटनेशी संबंधित एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे.

शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठक आटोपल्यानंतर आमदार गिरीश महाजन आणि पदाधिकारी बाहेर आले होते. त्यावेळी एका कार्यकर्ता दरवाजातच लोळत होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो मनोरुग्ण असल्याचे सांगत त्याला बाजूला नेले होते. त्यानंतर महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि कार्यालयातून निघून गेले.

काही वेळाने गिरीश महाजन हे पुन्हा एकदा कार्यालयात आले. त्यावेळी विजय नावाच्या या कार्यकर्त्याने महाजनांना शिवीगाळ सुरू केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका पदाधिकाऱ्याच्या कारवर दगडफेकही केली. या संपूर्ण घटनेबद्दल एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपाचे पदाधिकारी दीपक सूर्यवंशी म्हणाले, “हल्ला करणारी व्यक्ती भाजपाचा कार्यकर्त्या नसून, एक मनोरुग्ण आहे. तो मद्यपी असून अचानक कार्यालयात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *