| मुंबई | चीनवर एकामागोमाग डिजिटिल स्ट्राईकच्या घटना मागील काही दिवसात सुरूच आहे. आधी भारताने ५९ चीनी अॅप हटवत चीनला दणका दिला होता. अमेरिका देखील चीनी शॉर्ट व्हिडीओ अॅप टीक-टॉकवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. यातच आता गुगलने चीनशी संबंधित असलेले जवळपास २५०० युट्यूब चॅनेल डिलिट केले आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून खोटी व भ्रामक माहिती पसरवली जात असल्याने हे चॅनेल हटविण्यात आल्याचे गुगलने सांगितले आहे.
कंपनीने सांगितले की, या चॅनेल्सला एप्रिल ते जून या कालावधीमध्ये युट्यूबवरून हटविण्यात आलेले आहे. असे चीनसंदर्भात सुरू असलेल्या इन्फ्लूएंस ऑपरेशन्स अंतर्गत करण्यात आले आहे. युट्यूबने सांगितले की सर्वसाधारणपणे यावर स्पॅम, नॉन पॉलिटिकल काँटेंट पोस्ट केला जात होता. मात्र सोबतच राजकारणाशी संबंधित माहिती देखील पोस्ट केली जात असे.
गुगलने मात्र या चॅनेल्सच्या नावांचा खुलासा केलेला नाही. मात्र कंपनीने सांगितले की ट्विटरवर देखील अशीच एक्टिव्हिटी असणारे काही लिंक पाहण्यात आले आहेत. सोशल मीडिया एनालिटिक्स कंपनी ग्राफिकाने यासंदर्भात माहिती दिली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .