| मुंबई | सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट्सकडून गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या काही धोकादायक अॅप्सबाबत माहिती शोधली आहे. जोकर मालवेअर या व्हायरसमुळं आपल्या मोबाईल डेटाची चोरी होऊ शकते तसंच आर्थिक फटकाही बसू शकतो. या व्हायरसशी संबंधित अॅप्स जवळपास दोन लाख वेळा डाऊनलोड केली गेली आहेत. एका रिपोर्टनुसार यात कनविनियन्ट स्कॅनर 2, सेफ्टी अॅपलॉक, पुश मेसेज- टेक्सटिंग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सेपरेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्स अशा अॅप्सचा समावेश आहे. असे अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ती तात्काळ अनइन्स्टॉल करा, अशा सूचना सायबर तज्ञांनी दिल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, अशा अॅप्सला गूगल प्ले स्टोअरवरुन काढलं आहे मात्र आणखी काही स्मार्टफोन्समध्ये हे अॅप आहेत. त्यांनी तात्काळ डिलिट करावेत, असा सल्ला दिला आहे. जोकर मालवेअर फोनमध्ये आल्यानंतर यूजर्सला प्रीमियम सर्व्हिससाठी काहीही माहिती नसताना सब्सक्राइब केलं जातं. याआधी २०१७ साठी गूगलनं प्ले स्टोअरवरुन अशी १७०० अॅप्स हटवले आहेत. मात्र असे अॅप्स दुसऱ्या रुपात प्ले स्टोअरवर येत राहतात.
आता जोकर नावाचा वायरस आता तुमच्या मोबाईलमध्ये शिरू शकतो आणि तुमच्या नकळत तुमचा डेटा आणि तुमचा बँक अकाउंट लांब कुठेतरी बसलेल्या हॅकर जवळ सहज पोचू शकतो आणि याची तुम्हाला कल्पनाही लागणार नाही. जोकर व्हायरसमुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अकरा अँड्रॉइड ॲप्लिकेशनद्वारे जोकर वायरस आपल्या मोबाइलमध्ये येऊ शकतो.
दरम्यान, कोणतेही अनोळखी ऍप डाऊनलोड करू नका. हे अँड्रॉइड ॲप आपण जेव्हा डाउनलोड करतो. तेव्हा यांच्यामध्ये आधीपासून असलेल्या जोकर वायरस आपल्या मोबाईलमध्ये शिरकाव करतो आणि आपल्या मोबाईल मधील महत्त्वाच्या माहितीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मोबाईलवरुन किंवा नेट बँकिंगद्वारे केले जाणाऱ्या सगळ्या ट्रांजक्शनची माहिती लिक होऊ शकते. ज्यामुळे मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून कुठेही ॲप डाऊनलोड करताना एकदा तपासून घ्या आणि अनोळखी नंबरद्वारे आलेला मेसेज किंवा लिंक आणि मेलवर क्लिक करू नका, असा सल्ला सायबर तज्ञांनी दिला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .
1 Comment