जुनी पेन्शन तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देखील न्याय देण्याबाबत बाबत प्रयत्नशील- आमदार रोहित पवार

| पुणे | आमदार रोहित पवार यांनी ट्विटर द्वारे स्वतः असे सांगितले की सरकारने जुनी पेन्शन देण्यासोबतच अनेक प्रश्नांवर सकारात्मक नियजोन केले होते व करतही आहे पण अचानक कोरोनाचे संकट आल्यामुळे अनेक गोष्टींची पूर्तता करण्यामध्ये विस्कळीतपणा आला; तरीही सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर म्हणजेच लवकरात लवकर सदर प्रश्न मार्गी लागेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल अशा प्रकारचे सकारात्मक व लाखो कर्मचाऱ्यांना आशादायी असे ट्विट युवा आमदार रोहित पवार यांनी केले.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1293448768935755776?s=19

सदर ट्विट हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे कल्पेश चौधरी यांच्या ट्विटला उत्तर देताना रोहित पवारांनी केले आहे. त्यामध्ये कल्पेश यांनी रोहित दादांना गोंदिया जिल्ह्यातील सलेकसा तालुक्यातील मशीटोला येथील मृत कर्मचारी श्री भोजराज गोमा पुंगळे यांच्या कुटुंबाची त्यांच्या पश्चात होत असलेली वाताहात, त्यांचे होत असलेले हाल याबाबत व्यथा मांडली तसेच २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन देण्याची मागणी करत दादांना भावनिक साद घातली आणि आमदार रोहित पवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल असे उत्तर दिले.

रोहित पवारांच्या या सकारात्मक ट्विटमुळे राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एकप्रकारचा उत्साह निर्माण झाला असून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत याबाबत समाधानही व्यक्त केले जात आहे. तसेच रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही लाखो कर्मचाऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.

पदाधिकारी यांचे संबंधित काही ट्विट :

https://twitter.com/choudhari22ashu/status/1293476330550390784?s=19

https://twitter.com/iamprajakt/status/1293488939148259328?s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *