जुनी पेन्शन मधील फॅमिली पेंशन व ग्रॅच्युएटीच्या प्रश्नाला न्याय देणार – मंत्री विजय वडेट्टीवार, जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली होती भेट..!

| चंद्रपूर | काल १७ नोव्हेंबर २०२० ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूरच्या शिष्टमंडळाने मंत्री विजय वडे्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेतली व यापूर्वी दिलेल्या निवेदनाचे स्मरण करून देण्यात आले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूरने दिलेल्या निवेदनाची आठवण करुन देण्यात आली आणि चंद्रपूर व राज्यातील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची असलेली दयनीय अवस्थेची जाणीव देखील करून देण्यात आली. चंद्रपूरसह राज्यातील तीन हजाराच्या वर कर्मचारी मयत झालेले आहे. त्यांचे कुटुंब आज उघड्यावर आले आहे. त्यांच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय देण्यासाठी त्यांना फॅमिली पेंशन व ग्रॅच्युएटी दिल्यास एक प्रकारची भाऊबीजेची भेट ठरेल तेव्हा या संदर्भात लवकरच मंत्रालयीन बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री विजय वडे्टीवार यांनी दिले.

खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना देखील संसदेत सदर मुद्दा उपस्थित करण्याकरिता विनंती करण्यात आली. केंद्रातील NPS धारक यांना अतिरिक्त लाभ म्हणून फॅमिली पेंशन व ग्रॅच्युएटी दिल्या जाते मग महाराष्ट्र राज्यातील NPS धारकाला का नाही ? जर केंद्रातील NPS यांना कर्मचारी मृत झाल्यानंतर न्याय देऊ शकत नाही म्हणून त्यांना अतिरिक्त लाभ फॅमिली पेंशन, ग्रॅच्युएटी मिळते तर पुरोगामी महाराष्ट्रात देखील द्यायलाच हवे. हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी आश्वस्त करण्यात आले.

त्यावेळी पंजाब, उत्तराखंड, कर्नाटक या राज्यातील कर्मचाऱ्यांना फॅमिली पेंशन, ग्रॅच्युएटी लागू आहे हे निदर्शनास आणून देण्यात आले. वरील बाबी निश्चितच अन्याय कारक असुन यासंदर्भात मी नक्कीच प्रयत्न करेल असे अभिवचन पालकमंत्री विजय वड्डेटीवार व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी दिले. यावेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दुशांत निमकर, खाजगी विभाग प्रमुख सचिन चिमुरकर, जिल्हा प्रवक्ता अनिल डहाके, शिक्षण विभाग प्रमुख पंकज उद्धरवार व सोशल मीडिया प्रमुख मंगेश साखरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *