
| जालना | विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर हे मराठवाडा दोऱ्यावर आले असता आज जालना जिल्ह्यात आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले त्यामध्ये प्रामुख्याने सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह मयत कर्मचाऱ्यांना तात्काळ फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युईटी प्रदान करावी, राज्यात सुरू असलेली एनपीएसची सक्ती तात्काळ थांबवून मागील पंधरा वर्षात झालेल्या कपातीच्या हिशोबाबबात कार्यवाही व्हावी, कोविड काळात मयत झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लक्ष रुपये मदत देण्यात यावी, जिल्हाबदली झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या झालेल्या कपातीचा एकत्र हिशोब द्यावा, २००५ नंतर आजपर्यंत मयत कर्मचाऱ्यांना शासनाने काहीही मदत केली नाही तात्काळ ती मदत द्यावी, यांसह इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावर विधानपरिषदेत जुनी पेन्शन या विषयावर आवाज उठवणार तसेच मयत कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळवून देणार आणि तसेच या विषयावर विधानपरिषदेत योग्य भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार अशी ठाम भूमिका प्रवीण दरेकर यांनी घेण्याचे आश्वासन जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी शिष्टमंडळात जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्यप्रसिद्धीप्रमुख संतोष देशपांडे, जालना जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर, अशोक नाकाडे, शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!