जूनी पेन्शन सह शिक्षण सेवक पद रद्द करावे या मागणीसाठी, जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट..!

| कोल्हापूर / विनायक शिंदे | जूनी पेन्शन योजना, शिक्षण सेवक पद रद्द करणे व सध्या प्रशासन जोर देत असलेल्या एनपीसी फॉर्म भरणे आदी विविध प्रश्नांवर कोल्हापूर जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली.

शिक्षक म्हणून नविन नियुक्ती होत असतानाचे शिक्षण सेवक पद रद्द करावे व आता या पदावर कार्यरत असलेच्या शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करावी, राज्यभर जिल्हा स्तरावरून एनपीएस फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे या फॉर्म भरण्याविषयी कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष आहे या बाबत लक्ष घालावे , मनपा, नपा कर्मचारी यांना कोणताही निर्णय आजतागायत नसल्याने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, जिल्हा परिषद स्तरावरून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक , विषय शिक्षक पदोन्नती लवकरात लवकर करण्याविषयी सूचना द्याव्यात अशा विविध मागण्या ग्रामविकास मंत्र्याकडे करण्यात आल्या.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व संबंधित विभागांशी मंत्रालयीन स्तरावरून चर्चा करणार असल्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटनचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या सह कार्याध्यक्ष राहुल कांबळे, गजानन कुंभार, स्वप्नील सांगले, अमित सुर्वे, कृष्णात पाटील, संजय मेस्त्री, दिपक डोणे, चंद्रकांत कुंभार, सुनिल तिकुटे, सागर पाटील, गिरीश प्रभू , प्रशांत राणे, अजित पाटील, प्रसाद सुतार, महेश गुरु आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *