जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या ऑनलाईन वाचन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद..!

| पुणे / विनायक शिंदे I भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिन यांचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन हवेली च्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धस संपूर्ण राज्यातून उदंड प्रतिसाद लाभला.

मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बंद आहेत परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे म्हणून शासनस्तरावरून दुरदर्शन, दीक्षा अँप आदी ऑनलाईन माध्यमातून शिक्षणाचे काम सुरू आहे, परंतु सहशालेय उपक्रमापासून विद्यार्थी वंचित राहू नये, वाचनाचे महत्व समजावे, “वाचाल तर वाचाल “या उदात्त विचाराने भारतरत्न डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या पुढाकाराने आणि माझा ऑनलाईन अभ्यास टीमच्या वतीने ” प्रभावी ऑनलाईन राज्यस्तरीय वाचन ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन करून घेऊन स्पर्धकाकडून वर्गगटानुसार प्रभावी वाचनाचे विविध विषयांवर व्हिडिओ मागविण्यात आले होते. एकूण 250 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विजेत्यांना ऑनलाईन आकर्षक प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रेरणा म्हणून सहभागी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ता. हवेली चे अध्यक्ष सागर शिंदे , सर्व सदस्य, माझा ऑनलाईन अभ्यास टीम मोहन शिंदे , मनोज पांचाळ , संतोष रत्नपारखे , सागर कांबळे या सदस्यांनी मेहनत घेतली.

स्पर्धेचा निकाल पुढिलप्रमाणे :

✓ गट पहिली- दुसरी..

प्रथम क्रमांक – ज्ञानेश निलेश्चंद्र चौधरी, मुंबई
द्वितीय क्रमांक – प्रत्युषा प्रसन्न पालकर, मुंबई
तृतीय क्रमांक – धनश्री ज्ञानेश्वर कोटूळे, बीड

✓ गट तिसरी – चौथी..

प्रथम क्रमांक – स्वरा रवींद्र शिर्के ,औरंगाबाद,
द्वितीय क्रमांक – संयमी दत्तात्रय भोकसे,पुणे
तृतीय क्रमांक – हर्षवर्धन संदीप काशीद ,सोलापूर

✓ गट पाचवी- आठवी..

प्रथम क्रमांक – आदित्य लक्ष्मण जगताप, पुणे
द्वितीय क्रमांक – श्रेया प्रकाश भोई, हवेली पुणे
तृतीय क्रमांक – जान्हवी मुकुंद गावंडे, हवेली पुणे

Leave a Reply

Your email address will not be published.