जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी अफवा पसरवू नयेत; वन रुपी क्लिनिक चे डॉ. राहुल घुले यांची मनसेच्या आमदारावर अप्रत्यक्ष टिका..!

| डोंबिवली | वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून पाटीदार भवन कोविड सेंटर व ह भ प सावळाराम महाराज क्रीडा संकुल कोविड सेंटर वर स्थानिक मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले असून, जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी अश्या प्रकारे भ्रम पसरवणे योग्य नसल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे आमदार राजू पाटील यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, राजू पाटील यांनी एकंदरित कोविड सेंटर वरील सावळा गोंधळ म्हणत असुविधा होत असल्याचे व रुग्णालयाचा वापर अधिकचा नसल्या बाबत टीका केली होती. त्याचा समाचार घेत डॉ. घुले यांनी सुस्पष्ट रीतीने उपचार घेणाऱ्यांची संख्या सांगितली असून सध्या दोन्हीही ठिकाणी जवळपास ४०० सामान्य कुटुंबातील रुग्ण मोफत दर्जेदार उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथील रुग्णांची अद्याप एकही तक्रार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे, जबाबदार लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक भ्रम तयार करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी आवर्जून म्हंटले आहे.

https://twitter.com/thelokshakti/status/1293812710631600128?s=19

दरम्यान, पाटीदार भवन कोविड सेंटरचे श्रेय देखील राजू पाटील यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते त्यांना शिवसैनिकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या टीकेमुळे जमले नव्हते. परंतु एकीकडे श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे त्यावरच टीका अशी दुटप्पी भूमिका प्रत्येक बाबतीत हे स्थानिक मनसेचे आमदार घेत आहेत की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना खाटा टाकण्याचे प्रकार होत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हंटले होते. म्हणजे त्यांना कल्याण डोंबिवली मनपा प्रशासन करत असलेल्या परिश्रमाने कोविड रुग्णांची संख्या कमी होत असताना ही कमी होणारी संख्या रुचत नाही की मनपा प्रशासन हॉस्पिटल क्षमता वाढवत आहे, हे रुचत नाही, या बाबत गोंधळाची भूमिका दिसून येत आहे. एकंदरीत नक्की आपली भूमिका काय असावी या बाबत त्यांची संभ्रम अवस्था नेहमीसारखी दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *