जिम सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक..! मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन..!

| मुंबई | कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं जलतरण तलावांसह जिम आणि चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये घेतला होता. लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील जिम बंद असून, त्या सुरू करण्याची परवानगी सरकारनं द्यावी, अशी मागणी राज्यातील जिम मालकांकडून केली जात आहे. या संबंधी राज ठाकरे यांना देखील शिष्टमंडळ भेटले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील जिम मालकांनी भेट घेतली. यावेळी जिम सुरू करण्याबद्दल राज्य सरकार सकारात्मक असून, जिममुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी मार्गदर्शक तत्वे सादर करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी जिम मालकांना केली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील जिम बंद करण्यात आल्या होत्या. मार्चपासून जिम बंद असून, मागील काही दिवसांपासून जिम सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यांची आज मुंबईतील जिम चालकांनी भेट घेतली. जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी सादर करावीत, त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल,” असं मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम मालकांच्या शिष्ट मंडळाला सांगितलं.

राजकीय नेत्यांची मागणी :
राज्यातील जिम सुरू करण्याची मागणी जिम मालकांसह राजकीय नेत्यांनी राज्य सरकारकडे केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारनं जिम सुरू करायला हव्यात, असं म्हटलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं याकडे लक्ष वेधलं होतं. “महाराष्ट्रातले जिम बंद करण्यात आले आहेत. मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने आता जिम पुन्हा सुरु करणं आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी त्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे,” असं सांगत सुप्रिया सुळे यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *