ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही, पक्षाने दखल घेतली नाही तर जनतेच्या दरबारात न्याय मागेल – एकनाथ खडसे

| मुंबई | खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तिथे बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे आहेत, ती समोर आली तर हादरा बसेल. मात्र मी इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. मी वरिष्ठांना ते दाखवलं आहे. त्यांच्यासारख्या चुका मी केल्या नाहीत, असं खडसे म्हणाले.

या व्यक्तिगत बाबी आहेत, मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर त्या बाबी मांडल्या आहे. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन. यामुळं काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही. जे होईल ते जनतेसमोर येईल असा इशाराही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

यावर प्रकरणाला विशेष फोडणी देताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, नाथाभाऊंनी त्यांच्याकडे असलेले भाजपाच्या कोणत्यातरी नेत्यांचे व्हिडिओ क्लीप व फोटो देशहितासाठी जनतेसमोर आणले पाहिजेत. त्यांच्या गप्प राहण्यामुळे भाजपाच्या माध्यमातून जनहितविरोधी व ज्यांचे चरित्र संशयास्पद आहे असे नेतृत्व जनतेवर लादले जात असेल तर ते उचित नाही, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *