जलदगती गोलंदाज शोयब अख्तर वर ही नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता..!

| इस्लामाबाद | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या खांद्यावर येत्या काही दिवसांत नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचं अध्यक्षपद शोएब अख्तरला मिळण्याची शक्यता आहे. सध्या मिसबाह उल-हक कडे पाक क्रिकेट बोर्डाचं निवड समिती प्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक अशी दोन्ही महत्वाची पद आहेत. परंतू नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानची कामगिरी अतिशय खराब झाली. ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्ड मिसबाहची निवड समिती प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्याच्या तयारीत आहे.

Cricket Baaz या यू-ट्युब कार्यक्रमात बोलत असताना शोएब अख्तरने या वृत्ताला दुजोला दिला. “हो, हे खरं आहे. पाक क्रिकेट बोर्डाने मला निवड समिती प्रमुख पदावर काम करण्याबद्दल विचारलं आहे. याबाबत माझी पाक क्रिकेट बोर्डातील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून मला ही नवीन जबाबदारी घ्यायला आवडेल. परंतू अद्याप काही गोष्टींवर चर्चा सुरु आहे, त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही.”

परंतू चर्चेचा अधिक तपशील सांगण्यास अख्तरने नकार दर्शवला. त्यामुळे येत्या काही दिवसांत शोएब अख्तर आपल्याला एका नवीन भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.