
| इंदापूर/ महादेव बंडगर | गुरुवारी (दि 22 ऑक्टोबर) भिगवण शेटफळगडे गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री बाबुराव आप्पा वायकर , जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर, सौ वैशालीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिगवण, मदनवाडी ,पोंधवडी, अकोले, लाकडी, शिंदेवाडी, काझड या गावातअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा पार पडला.
यावेळी भिगवण येथील पशुसंवर्धन दवाखान्याची पडलेली भिंत, पोंधवडी गावातील ओढ्यावर पुरामुळे झालेल्या पिकाच्या व शेतीच्या नुकसानीची पाहणी तसेच गावात होत असलेल्या कोविड टप्पा 2 च्या सर्वेक्षणाची पाहणी,अकोले गावात ग्रामस्थांशी संवाद, लाकडी गावातील ग्रामस्थांशी संवाद व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र च्या इमारती ची पाहणी , शिंदेवाडी येथील पाझर तलाव फुटून झालेल्या पिकांची व शेतीची पाहणी ग्रामस्थांशी संवाद,काझड येथे ओढ्याच्या ठिकाणी पुरामुळे झालेल्या पिकांची नुकसानीची पाहणी यावेळी करण्यात आली. या वेळी ज्यांचे घरांचे, पिकांचे आणि शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. त्यांचे पंचनामे व्यवस्थित करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी संबंधित अधिकारी यांना केल्या. तसेच शेतकऱ्यांना आधार देऊन जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत असल्याचेही आश्वासित केले.
यावेळी कृषी अधिकारी श्री देशमुख साहेब, पशुसंवर्धन अधिकारी विधाटे साहेब, तालुका कृषी अधिकारी रूपनवर साहेब, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब,काळे साहेब, महसूल चे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी येणाऱ्या विविध अडचणी पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्या लवकरच सोडवल्या जातील असे आश्वासन यावेळी देण्यात आले. पंचनामे करताना कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!