जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत ! शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक !

| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन/ पुणे I ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे आयोजित पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी येथील इ.५ वीच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन करत २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांची वतीने दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करत असते . या वर्षीही परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये झाली होती.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण येथील १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चि. प्रथमेश रविशंकर लांडगे व चि. गणेश शिवाजी फड या २ विद्यार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. कोरोना साथीदरम्यान शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले होते.

इ.५ वी च्या विद्यार्थांना मुख्याध्यापक श्री.आत्माराम वाघमारे , सौ. वैशाली वाळूंज व श्री नवनाथ राणे यांनी मार्गदर्शन केले.

मुळशी पंचायत समितीचे सभापती श्री. पांडूरंग ओझरकर, गटविकास अधिकारी संदीप जठार, गट शिक्षणाधिकारी माणिक बांगर, माण च्या सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच शशिकांत धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य रवी बोडके, ग्रामपंचायत समिती सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडीत गवारे, उपाध्यक्ष पांडूरंग महाडीक, केंद्र प्रमुख सुरेश साबळे, ग्रामविकास अधिकारी बी.आर. पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.