जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणचा राजू कांबळे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत…

| पुणे | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी जि. पुणे येथील चि. राजू शरणाप्पा कांबळे याने इ.८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने दरवर्षी इ.५वी व ८ वी च्या वर्गातील विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी येथील इ.८वी च्या वर्गातील चि. राजू शरणाप्पा कांबळे याने १८० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. राजू कांबळेला मुख्याध्यापक श्री.आत्माराम वाघमारे, वर्गशिक्षक श्री. लक्ष्मण दिघे, सौ. आशा मकवान, श्रीम. प्रिती चौहान यांनी मार्गदर्शन केले.

राजूच्या यशाबद्दल मुळशी पंचायत समितीचे सभापती श्री. पांडूरंग ओझरकर, गटविकास अधिकारी श्री. संदिप जठार, गटशिक्षणाधिकारी श्री. माणिक बांगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडीत गवारे, केंद्र प्रमुख सुरेश साबळे, ग्रामविकास अधिकारी भरत पाटील, माजी सरपंच राजेंद्र भोसले, माजी सरपंच बजाबा शेळके, सुवर्णा गराडे, डॉ. यशराज पारखी, पांडूरंग महाडीक, पालक , ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *