जि.प. शाळा हिंजवडीचे १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत…

| पुणे | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे येथील इ.८ वीचे १२ विद्यार्थी व इ.५ वीचा एक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आला आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडीच्या पुढिल १२ विदयार्थानी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

१. प्रियांका विकास तालीकोटी (गुण – २४२ )
२. प्रियांका गोविंद लिबारे ( गुण – २३४ )
३. तेजस जितेंद्र जाधव ( गुण -२३२)
४. दिव्या शिवानंद फसमले (गुण – २२८ )
५. रिचाकुमारी संजय पांडे (गुण -२२६)
६.आदित्य नारायण पाटील (गुण -२२०)
७. सुनिता प्रल्हाद ढंगारे (गुण -२१६ )
८. तनुजा किसन घाडगे ( गुण -२१४ )
९. सुहानी रमेश हटकर ( गुण -२०८ )
१०.नंदिनी सिध्देश्वर धावारे (गुण -१९४ )
११. रितेश राजू सरवदे ( गुण – १९२ )
१२. अजय बाळू उदागे

इ.५वी
१ . मिस्बा शफिक खान ( गुण -२२६ )

जि.प. प्राथमिक शाळा हिंजवडीचे मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ वाघुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीम. शोभा कळमकर, श्री. दिलीप झोळ, श्रीम. दिलशादबानू पटेल यांनी इ.८वी च्या विद्यार्थांना मार्गदर्शन केले तर इ.५वी च्या विदयार्थास श्रीम. रसिका परतवार यांनी मार्गदर्शन केले.

गुणवत्ता धारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुळशी पंचायत समितीचे सभापती श्री. पांडूरंग ओझरकर , माजी सभापती कोमल साखरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, गटविकास अधिकारी श्री. संदिप जठार, गट शिक्षणाधिकारी माणिक बांगर, केंद्र प्रमुख सुरेश साबळे ग्रामपंचायत हिंजवडी , शाळा व्यवस्थापन समिती हिंजवडी, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *