ठाकरे सरकारमधील अजुन एका मंत्र्याला कोरोनाची लागण..!

| मुंबई | महाविकास आघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. संजय बनसोडे हे उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. बनसोडे यांना ताप आणि घशात खवखव जाणवत असल्यामुळे त्यांची कालच कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

संजय बनसोडे हे लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात कोरोनाच्या काळात काम करत होते. आपल्या मतदारसंघातील काही कामानिमित्त बनसोडे मागचा आठवडाभर मुंबईमध्ये होते, तेव्हा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याआधी महाविकासआघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती, पण या सगळ्या मंत्र्यांनी कोरोनावर मात केली. तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोना झाला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *