डिसेंबर महिन्यात इतक्या दिवस बँक राहणार बंद..! घ्या जाणून..

| नवी दिल्ली | डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण राज्यांनुसार बँकांना बंद असणार आहेत. त्यामुळे बँकांचे व्यवहार वेळेत पूर्ण करा. डिसेंबर २०२० मध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. आता नवीन महिना आणि नवीन कामांच नियोजन सुरू झालं असेल. तर या नियोजनापूर्वी जाणून घ्या डिसेंबर महिन्याचं शेड्युल.

महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर असल्यामुळे बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला रविवार असल्यामुळे देशभरातील सर्वच बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे.

यानंतर १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि १३ डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँकांचे कामगाज बंद राहणार आहे. २० डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत. त्यानंतर २४ अणि २५ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.

शिवाय २६ आणि २७ डिसेंबर रोजी चौथा शनिवार, रविवार असल्यामुळे सलग चार दिवस काम बंद राहणार आहेत. यामुळे बँकांशी संबंधीत सर्व काम वेळेत करून घ्या.

वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुट्या
गोव्यात १७ डिसेंबरला लॉसोन्ग पर्व, १८ डिसेंबरला डेथ ऍनिव्हर्सरी यू सो थम आणि १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन असल्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. तर ३० डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि ३१ डिसेंबरला इयर्स ईव असल्यामुळे काही राज्यामध्ये बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.