डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन करणार जागतिक विक्रम, १००० विद्यार्थ्यांद्वारे १०० उपग्रह बनवून एकाच वेळी सोडणार अवकाशात..!

| पालघर | डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे कलाम सर यांचे विद्यार्थ्यांसाठी टेकनॉलॉजि चे स्वप्न पूर्ती साठी १०० उपग्रह विद्यार्थ्यांनी बनविलेले एकाच वेळी प्रक्षेपित करणार आहे. या उपक्रमा मुळे शेकडो विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्याची संधी मिळणार आहे. कदाचित उद्याचे डॉ कलाम या विद्यार्थ्यांमध्ये दडलेले असू शकतात. भारतात प्रथमच अश्या प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रा मधून सुद्धा अनेक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. हा उपक्रम ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.

१० विद्यार्थ्यांची एक टीम एक उपग्रह स्वतः बनवेल. हे उपग्रह बनविण्याचे ६ ऑनलाईन प्रशिक्षण दिले जातील. २ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान ऑनलाईन प्रशिक्षण होईल. सातवे एक दिवसीय प्रत्यक्ष उपग्रह बनविणाच्या प्रशिक्षणासाठी चेन्नई येथे स्वखर्चाने जावे लागेल. १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान बॅच प्रमाणे एक दिवसीय प्रशिक्षण चेन्नई येथे दिले जाईल. विद्यार्थ्यांकडून त्यांचा उपग्रह प्रत्यक्ष बनवून टेस्ट करून घेतला जाईल. ७ फेब्रुवारी रोजी डी आर डी ओ चे चेअरमन यांचे उपस्थित रामेश्वरम येथून हेलियम बलून मार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह अवकाशांत सोडण्यात येतील. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये केली जाईल.

प्रत्येक विदयार्थ्यामागे प्रशिक्षण, उपग्रह बनविणे आणि अवकाशात सोडणे चा खर्च रुपये १०,०००/- आहे. उपग्रह प्रत्यक्ष बनविण्यासाठी चेन्नई येथे स्वखर्चाने जावे लागेल. महाराष्ट्रातील सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रेन च्या ए सी ने नेणे आणि आणणे, एक दिवसीय हॉटेल चे वास्तव्य आणि इतर खर्च मिळून प्रत्येक विद्यार्थ्यास १०,०००/- खर्च आहे. म्हणजे एकत्रित खर्च २०,०००/- होईल. महाराष्ट्रातील फाऊंडेशन चे पदाधिकारी स्वतः विद्यार्थ्यांसोबत जातील . आणि सर्व विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करतील.

या प्रकल्पाची नोंदणी १) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स २) आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् ३) इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात येईलआणि प्रकल्पाचे सहभाग पत्र विद्यार्थ्यांना मिळेल.

विदयार्थ्यास या प्रकल्पाचे होणारे फायदे – १) जागतिक पातळीवर नोंद होणाऱ्या प्रकल्पात सहभाग २) उपग्रह तंत्रगण्यानं शिकण्याची संधी ३)स्वतः प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची संधी ४) पूरक अवजारांचे मोफत किट ५) उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची संधी . तरी अश्या शाळा ज्या हा भार घेऊ शकतील किंवा एखाद्या स्पॉन्सरर तर्फे विदयार्थी येऊ शकत असतील ज्या जिल्हापरिषद आणि महानारपालिका , नगरपालिका आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे खर्चाने पाठवू इच्छित असतील त्यांनी तर मिलिंद चौधरी ९१६७१२८९०५, मनीषाताई चौधरी ९५४५९३८९३८, डॉ ज्योती महाजन ९४२९४ ९०८८६, शाहू संभाजी भारती ९९७५७३८३२१ पालघर यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन मा. मिलिंद चौधरी ( सचिव, डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम, तामिळनाडू ) यांनी केले आहे.

” अश्या स्वरूपाचा उपक्रम ही विद्यार्थ्यांसाठी नामी संधी आहे. हा उपक्रम भारतात प्रथमच राबविला जात असून त्यासाठी डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम, तामिळनाडूचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्नरत आहेत..महाराष्ट्रामधून सुद्धा अनेक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्यात पालघर जिल्ह्याचे अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होतील. असा विश्वास वाटतो.”

– श्री. शाहू संभाजी भारती (कोर कमिटी सदस्य, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन महाराष्ट्र)

Leave a Reply

Your email address will not be published.