डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न..!

| डोंबिवली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर शिवसेनेच्या वतीने मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सेनेच्या वतीने आयोजित कऱण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरांमध्ये महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे आढळून आले होते. यामुळेच अनेक महिला शिवसैनिकांना रक्तदान करता आले नव्हते.

या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात सर्वं महिला भगिनींना रक्तवाढीची औषध आणि टॉनिक वितरित करण्यात आले. शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सहकार्याने कोपर (डोंबिवली) विभागात मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेना नगरसेवक श्री.रमेश म्हात्रे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नाने कोपर (डोंबिवली) परिसरात मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून ३२५ महिलांची तपासणी करून मोफत औषधें देण्यात आली यावेळी विभागतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले. तसेच या शिबिरासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार सर, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्री विनोद जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.

हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वैद्यकीय सहाय्यक सर्वश्री राम राऊत, माऊली धुळगंडे, निलेश देशमुख, अरविंद मांडवकर, प्रसाद सूर्यराव, नितीन हिलाल, सागर झाडे, राहुल भालेराव, दीपाली चव्हाण, शिवकांत निषाद, ऋषिकेश देशमुख यांच्यासह शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातील सर्व टीमने मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.