तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षणसेवकांचे मानधन वाढवावे, जुन्या पेन्शन हक्क संघटनेने घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट..!

| सांगली | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून मा. ना. हसन मुश्रीफ साहेब, ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांना शिक्षण सेवक पद्धत बंद करणे, शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून निवेदन देण्यात आले. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करण्याचे आश्वासन यावेळी ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिले.

यावेळी दिलेल्या निवेदनात राज्यातील शिक्षण सेवक पद्धत बंद करण्यात यावी. त्याचवेळी याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षणसेवकाना २४००० मानधन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

राज्य व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी १५ वर्ष सेवेची अट असल्याने अनेक पात्र युवा शिक्षक या पुरस्कारापासून वंचित राहतात. रणजितसिंह डिसले यांनी ग्लोबल टीचर अवार्ड मिळवत समस्त शिक्षक वर्गाला अभिमानास्पद कामगिरी केली. महाराष्ट्रात राज्य/जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्करासाठी 15 वर्ष सेवेची अट बदलणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी 15 वर्ष सेवेची अट रद्द करण्यात यावी, ही मागणी यावेळी करण्यात आली.

जितेंद्र लोकरे, राहुल बामणे, शरद कोठावळे, प्रशांत घोलप यांनी निवेदन दिले. तर सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, सरचिटणीस राहुल कोळी,कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ, कोषाध्यक्ष राजकुमार भोसले, कार्यवाहक नेताजी भोसले यांनी स्वाक्षरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *