तब्बल ८०० वर्षांनी आज एक अद्भुत खगोलीय घटना..! साध्या डोळ्यांनी देखील पाहू शकता..!

| मुंबई | सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह आकाशात एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत. गुरु आणि शनि हे दोन ग्रह आठशे वर्षानंतर एकमेकांच्या अगदी जवळ येत आहेत. सोमवारी अर्थात आज संध्याकाळी ही अद्भूत गोष्ट तुम्हाला पाहता येणार आहे. ही एक आश्चर्यकारक खगोलीय घटना आहे. खगोल प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. पण ही घटना पाहण्यासाठी नासाने काही टीप्स सांगितल्या आहेत.

✓ सर्व प्रथम असं ठिकाण शोधा जिथून तुम्हाला मोकळं आकाश दिसेल. जसं की, मैदान किंवा उद्यान. उघड्या डोळ्यांनी देखील तुम्हाला ते पाहता येणार आहे. शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह तुम्हाला पाहता येणार आहे.

✓ सूर्यास्तानंतर एक तासानंतर तुम्ही नैऋत्यकडे ही घटना पाहू शकता.

✓ ग्रहांचे हे आश्चर्यकारक संयोजन उघड्या डोळ्यांनी देखील पाहता येऊ शकते. परंतु आपल्याकडे दुर्बिण असल्यास तुम्हाला ते आणखी व्यवस्थित पाहता येणार आहे.

✓ नासाने आणखी एक मोठी गोष्ट सांगितली आहे की, या संयोजनाची छायाचित्रे डीएसएलआर कॅमेरा तसेच सेलफोन कॅमेर्‍यामधून घेतली जाऊ शकतात.

खगोलशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ही खगोलीय घटना 17 व्या शतकात जुलै 1623 मध्ये घडली जेव्हा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या हयातीत दोन ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आले. त्या वेळी सूर्याजवळ असल्याने त्यांना पाहणे जवळजवळ अशक्य होते. यावेळी, मात्र सूर्यास्तानंतर हे दृश्य सहज पाहिले जाऊ शकते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवरून पाहिल्यावर एखाद्याला हे समजेल की हे दोन ग्रह एकमेकांच्या वर आले आहेत. परंतु प्रत्यक्षात दोघेही 6 अंशांवर असूनही एकमेकांपासून 73.6 किलोमीटर अंतरावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *