
| मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अमृता फडणवीस यांच्या मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यावरही अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप सरकार सत्तेत असताना गेली पाच वर्ष अमृत फडणवीस सरकारने पोलिसांचं कौतुक केलं. पोलिसांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहिले. मात्र भाजपचं सरकार गेले आणि सत्ता गेली म्हणून त्यांना आता असुरक्षित वाटू लागलंय. असं असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो.
मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? त्याच पोलिसांची सुरक्षा घेऊन आज त्या फिरत आहेत, असा टोलानी अनिल परब यांनी अमृता फडणवीसांना लगावला.
दरम्यान युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी देखील अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. “मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर,” असं त्यांनी लिहिलं आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!