दिलीप वळसे पाटलांच्या राजीनाम्यानंतर, जयप्रकाश साळुंके (दांडेगावकर) यांची वर्णी..!

| हिंगोली | वसमत येथील सहकार क्षेत्रातील अग्रणी व महाराष्ट्राचे माजी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश रावसाहेब साळुंके (दांडेगावकर) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महासंघाच्या संचालक मंडळाच्या 214 व्या शिखर बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली.

दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबांधित आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशन , मुंबईचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *