दिलासादायक : कोरोना टेस्टचे दर झाले अजून कमी.. पहा काय आहेत नवीन रेट..

| मुंबई | कोरोनाचे ढग अजुन गडद होत असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या टेस्टसाठी आता आणखी स्वस्त झाली आहे. ८०० ते ६०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या टेस्टसाठी आता आता जास्तीत जास्त दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे.

कोरोना टेस्टसाठी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास १२०० रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास १६०० रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन सॅम्पल दिल्यास २००० रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

याआधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना टेस्टसाठी आता जास्तीत जास्त २८०० रुपये इतका दर आकारला जात होता. रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला होता.

भारत जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहे. आता देशाची दररोज चाचण्यांची क्षमता ११.७० लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात आजवर झालेल्या एकूण चाचण्यांचा आकडा सुमारे पाच कोटी इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *