देशातील अर्धी जनता उपाशी असताना, नव्या संसद भवनाची गरज काय..?

| नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत नवे संसद उभे राहणार आहे. त्यासाठी तब्बल एक हजार कोटींची खर्च येणार आहे. यावरुन आता प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा संतप्त सवाल कमल हासन यांनी आता विचारला आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.