| नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. आतापर्यंत 71 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र जवळपास 62 लाख लोक कोरोनामुक्त झाले ही दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) महासंचालकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची 3 प्रकरणांची नोंद झाली आहे.
पुन्हा कोरोनाची लागण झालेल्या तीन रुग्णांमध्ये मुंबईतील 2 प्रकरणे आहेत, तर अहमदाबादमध्ये एका रुग्णाला दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. आयसीएमआरच्या संचालकांनी सांगितलं की, डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार जगात आतापर्यंत कोरोना रि-इन्फेक्शनची एकूण 24 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र डब्ल्यूएचओला अद्याप हे माहित नाही की कोरोनाचं पुन्हा संक्रमण 100 दिवसानंतर झालं की 90 दिवसांनंतर झालं. डब्लूएचओ सध्या हा कालावधी 100 दिवस मानत आहेत.
भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहे. गेले पाच आठवडे, दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दररोजच्या रुग्णांची साप्तहिक सरासरी संख्या 92,830 इतकी होती, मात्र आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही संख्या 70,114 पर्यंत कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत, 77,760 रुग्ण बरे झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 62 लाखांपेक्षा अधिक (62,27,295) झाली आहे. दररोज रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे, देशात रुग्ण बरे होण्याचा दरातही सुधारणा झाली आहे. सध्या हा दर 86.78% इतका आहे.
सक्रीय रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने घट होत आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकून पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत 11.69%इतकी म्हणजे 8,38,729 इतकी आहे. आज सलग पाचव्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 9 लाखांपेक्षा कमी आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .