| चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,भंगाराम तळोधी येथे विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दुशांत निमकर सर यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, संघटनात्मक कार्य बघता मानवसेवा विकास फाऊंडेशन अमरावतीने ‘स्टेट आयकॉन रिसर्च अवॉर्ड-२०२० ने सन्मानित करण्यात आले आहे.कोरोना काळ असल्याने समारंभ आयोजित न करता मानपत्र व सन्मानचिन्ह घरपोच पाठवून गुणगौरव करण्यात आला आहे.
महात्मा गांधीजी यांच्या १५१ व्या जयंतीवर्षं निमित्य ११ वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन आयोजित करण्यात आले होते परंतू कोरोनासदृश परिस्थिती असल्याने मानपत्र व सन्मानचिन्ह घरपोच पाठविण्यात आले.मानवसेवा विकास फाऊंडेशन(NGO), साप्ताहिक ग्रामवैभव, इंटरनॅशनल ह्यूमन रिसर्च पब्लिकेशन द्वारा विविध क्षेत्रातील विशेष प्रशंसनीय कार्य करणाऱ्या, जनसेवा करणाऱ्या तथा कोरोना काळात विविध सेवा देणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तींना पुरस्कार वितरण करण्यात आले यात जिल्ह्यातील दुशांत निमकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दुशांत निमकर हे शैक्षणिक कार्यासोबत विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विधायक कार्य करीत असतात. सोबतच ते संघटनात्मक,साहित्यिक कार्यातून समाजाची वास्तव स्थिती व विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत असतात.विविध अभिनव उपक्रमाने ते जिल्ह्यात परिचित आहेत त्यामुळे या सर्व कार्याची दखल घेत मानवसेवा विकास फाऊंडेशन,अमरावती तथा निवड समिती अध्यक्ष मा.डॉ.नंदकिशोर अरुण पाटील व इतर पदाधिकारी यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले.दुशांत निमकर यांना शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.यात ‘स्टेट आयकॉन रिसर्च अवॉर्ड’ने भर पडली असल्याने मित्र परिवार, नातेवाईक, शिक्षक, कवी, लेखक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .