दिशादर्शक निर्णय : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पगारदार ग्राहकांना देणार अपघात विमा पॉलिसी…!

| पुणे / विनायक शिंदे | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पगार जमा होणाऱ्या खातेदार ग्राहकांना वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण लागू होणार आहे.

बँकेच्या संचालक मंडळ सभेत झालेल्या ठरावानुसार बँकेत पगार जमा होणारे सर्व पगारदार खातेदार ग्राहक यांच्यासाठी व बँकेच्या सर्व सेवक यांच्यासाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण योजना लागू राहील. यामध्ये शासकीय, निमशासकीय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, बँकेचे सेवक, विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे सचिव इ. कर्मचाऱ्यांचा समावेश राहील . यामध्ये विमाधारकास अपघातामुळे मृत्यू , कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमा संरक्षण उपलब्ध होईल.

सदर योजना टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कं. लि. पुणे यांच्या मार्फत राबविले जाणार आहे. सदर योजना एक वर्ष कालावधी करीता असेल. पगारदार खातेदार ग्राहकाच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट विमा संरक्षित केला जाईल. यासाठी पगारदार खातेदार ग्राहकास प्रति एक लाख रु. २२ रु. प्रिमियम द्यावा लागणार आहे.

त्यात नक्की काय लाभ मिळणार : 

• विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना १०० टक्के क्लेम रक्कम मिळेल.
• अपघातामध्ये दोन हात, दोन डोळे , दोन पाय निकामी होणे अशा स्वरुपाचे कायमचे अपंगत्व आल्यास १०० टक्के विमा संरक्षण राहील.
• अपघातामध्ये एक हात किंवा एक डोळा किंवा एक पाय निकामी होणे अशा स्वरूपाचे कायमचे अपंगत्व आल्यास ५० टक्के विमा संरक्षण राहील.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राष्ट्रियीकृत बँकांच्या धर्तीवर State Government salary package द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन पुणे जिल्हा शाखा व इतर शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने वारंवार केली जात होती. पगारदार खातेदार अपघात विमा संरक्षण लागू केल्याने एसजीएसपीच्या योजना देखिल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने लवकरच लागू व्हाव्यात अशी प्रतिक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येते.

https://twitter.com/thelokshakti/status/1317400248105504771?s=19

✓ ” पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पगारदार खातेदार ग्राहकांना वैयक्तिक अपघात विमा योजना लागू केल्याबद्दल बँकेचे संचालक व उपमुख्यमंत्री अजित पवार, संचालक व कामगारमंत्री दिलिप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे , अध्यक्ष रमेशआप्पा थोरात व सर्व संचालक मंडळाचे आभार, राष्ट्रियकृत बँकांप्रमाणे विनामूल्य अपघात विमा ,सर्व सोयी सुविधा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने द्याव्यात.”
– संतोष गदादे
अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन पुणे जिल्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *