धक्कादायक : भारतात सांडपाण्यात देखील सापडले कोरोनाचे विषाणू..!

| नवी दिल्ली | देशातील कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत आहे. जवळपास ७५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून भारतात सध्य:स्थितीत २३.८ टक्के कोरोना रुग्ण आहेत. मात्र याचदरम्यान सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळले आहेत. हैदराबाद इथल्या ‘सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजी’नं (सीसीएमबी) हा दावा केला आहे. व्हायरसचे सापडलेले नमुने संसर्गजन्य नसल्याचंही सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीनं म्हटलं आहे.

सांडपाण्यातूनही कोरोना व्हायरस होऊ शकतो. आम्ही यासाठीच प्रयत्न करत आहोत. आम्हाला सांडपाण्यात कोरोनाचे नमुने सापडले आहेत आणि त्यांचं प्रमाण किती आहे, हेसुद्धा शोधण्यात आम्हाला यश मिळालं आहे, असं सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीच्या एका अधिका-याने सांगितले.

तसेच लोकांकडे जाण्यापेक्षा तुम्ही सांडपाणी एकत्र करून त्याची चाचणी करू शकता. यातील व्हायरसचं प्रमाण पाहून संबंधित भागात व्हायरसचा संसर्ग किती झाला आहे याची माहिती तुम्हाला मिळू शकते, अशी माहिती देखील त्या अधिका-यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.