धोकादायक ऊस वाहतुकीचा पहिला बळी ; भिगवन-बारामती रोडवर अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू.

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवन बारामती रोडवर धोकादायक पद्धतीने होत असलेल्या ऊस वाहतुकीविषयी दि.2 सप्टें. रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर ने दिलेल्या धडकेत एका मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. प्रकाश बाबुराव शेळके वय.50 रा. मदनवाडी असे या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे.ते आपल्या ड्रीम युगा मोटरसायकल MH.42. AC 4560 वरून मदनवाडी येथील घरी परतत होते. मोटरसायकलस्वार व्यवसायाने गवंडीकाम करत होते. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी मदनवाडी येथे परतत असतानाच त्यांचा हॉटेल लक्ष्मी समोर अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भयानक होता की, मोटरसायकल स्वाराचा मेंदूचं थेट बाहेर पडला.

याबाबतची फिर्याद श्री.गणेश पंडित शेळके , रा. तारादेवी लॉन्स , भिगवण , ता. इंदापुर जि.पुणे यांनी दिलेली असून एका अनोळखी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा र.नं 402/2020 नुसार भादवी कलम 279/304(अ)337,338,427 MV Act 184,134/177 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक कोणतीही खबर न देता पळून गेला. विशेष बाब म्हणजे या ट्रॅक्टरवर कोठेही नंबरही टाकलेला नव्हता. फिर्यादीवरुन गुन्हा रजि. दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा . JMFC सो न्यायालय, इंदापूर यांना रवाना केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. देवकाते ब.नं 1003 हे करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.