
| मुंबई / विशेष प्रतिनिधी | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विराट आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक करण्यात यावी अशी मागणी याचिकाकत्यार्ने केली आहे. ऑनलाइन गॅम्बलिंगची (जुगाराची) जाहिरात हे दोनही अभिनेते करत असून अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
चेन्नईस्थित एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहेत. विराट कोहली ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. युवकांमध्ये या अॅपचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे. तसेच विराट कोहली, तमन्ना हे सेलिब्रिटी अशा अॅप्सची जाहिरात करून तरूणांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याने या याचिकेत एका कर्जबाजारी तरुणाचा दाखला दिला आहे. एका तरूणाने या ऑनलाईन अॅपसाठी पैसे उसने घेतले होते. पण तो तरूण ते पैसे परत करू न शकल्याने त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री