धक्कादायक : दहावीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेस आज (३ मार्च) पासून सुरूवात झाली आहे. राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर हा धक्कादाय प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा पेपेर कॉपीहबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवर देखील पोहचल्या असल्याचेही समोर आले आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कामाकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर, शिक्षण मंडळच्या सचिवांनी परीक्षेसंबंधी दिलेल्या आदेशांकडे  केंद्र प्रमुखांनी सर्रास दुर्लक्ष केल्याचे यातून दिसून आले आहे.

मागीलल वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल घटल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ११ वाजेपर्यंत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहाणेचेही सांगण्यात आले होते.

राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत परीक्षेसंबंधीची माहिती दिली होती. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले या वेळी उपस्थित होते. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.